http://Gopaltakwale.blogspot.in मुंबई : मी काही दिवसांसाठी व्हॉटस अॅप डिलीट केलं, त्यानंतर दोन दिवसांनी जाणवलं की, किती शांत वाटतंय, यावर तुमचा विश्वास बसत नसेल, तर हा प्रयोग तुम्ही देखिल करून पाहा. व्हॉटस अॅपवर पुन्हा-पुन्हा येणारे मेसेज, अनावश्यक फोटो, व्हिडीओ आणि अलर्ट यामुळे तुमची मानसिक शांतता हिरावली जातेय, याचं उत्तर तुम्हाला नक्की यानंतर मिळणार आहे. व्हॉटस अॅपचा विरोध नाही व्हॉटस अॅपचा मी विरोध करतोय, असं काहीही नाही. मात्र त्याचा हवसे, गवसे आणि नवसे जे अतिवापर करतायत, नको नको तसा वापर करतायत, त्याचा त्रास सर्वांना होतोय. संबंधित मेसेज, व्हिडीओ, फोटो तुमच्याकडे पुन्हा आलाय, असा सिम्बॉल व्हॉटस अॅपकडून देण्यात येत नाही. तशी सोय व्हॉटस अॅपने करायला हवी, एक वेगळ्या रंगाने ते दाखवण्यात यावं, म्हणजे एकदा स्लाईड केलं की, हे डबल आलेले मेसेज डिलीट होतील. आपलं ऑफिसला असलेलं काम सोपं होतंय, महत्वाचा फोटो, किंवा मजकूर पाठवतोय, तर हा व्हॉटस अॅपचा योग्य वापर म्हणावा लागेल. व्हॉटस अॅपचा नेमका त्रास कुठे होतो ते पाहा पुन्हा-पुन्हा येणारे मेसेज, फोटो, व्हिडीओ, यात काही गोष...