News

स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी या खासगी बँकेने जगभरातील 200 देशांमधील खातेदारांची नावे उघड केली आहेत. ही नावे 2006-07 मधील दस्ताऐवजातील असून या गौप्यस्फोटाला स्विसलिक असे नाव दिले आहे. भारतातील उद्योग आणि राजकारणातील मोठी नावं या यादीतून समोर आली आहेत.

भारतीय खातेदारांच्या नावे तब्बल 25 हजार 420 कोटींची माया असल्याचे उघड झाले आहे. या यादीत नारायण राणेंचे कुटुंबिय- निलम राणे, निलेश राण, सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सूनबाई स्मिता ठाकरे यांच्यासह उद्योगक्षेत्रातील अंबानींसह अनेकांचे नावे आहेत.

इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्स्प्रेस’ने स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेतील खातेधारकांची नावं प्रसिद्ध केली आहेत. वॉशिंग्टनमधील आयसीआयजे आणि पॅरिसमधील 'ली मॉन्डे' वृत्तपत्र या शोधपत्रकारीता करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ने भारतीय खातेधारकांचा शोध घेतला आहे.

एचएसबीसी बँकेत खातेधारकांची नावं :

उद्योगपती : मुकेश अंबानी (164.92 कोटी रु.), अनिल अंबानी (164.92 कोटी रु.), आनंद चंद बर्मन (77.5 कोटी रु.), राजन नंदा, यशोवर्धन बिर्ला, चंद्रु लच्छमदास रहेजा, दत्ताराज सालगावकर, भद्रशाम कोठारी, श्रवण गुप्ता

हिरे व्यापारी :  रूसेल मेहता, अनुप मेहता, सौनक पारिख, चेतन मेहता, गोविंदभाई काकडीया, कुणाल शाह

राजकारणी : संयुक्त पुरोगामी आघाडीतील माजी मंत्री प्रेणित कौर, काँग्रेसचे माजी खासदार अन्नु टंडन (35.8 कोटी रु.), महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कांग्रेसचे नेते नारायण राणे यांचे कुटुंबीय - पत्नी निलिमा नारायण राणे आणि पुत्र निलेश राणे, तसेच काँग्रेसचे दिवंगत मंत्री वसंत साठे यांचे कुटुंबीय (4.64 कोटी रु.). दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सुन स्मिता ठाकरे ( 64 लाख रुपये)

दरम्यान, राणे कुटुंबातील कुणाचाही अशा खात्याशी संबंध नसल्याचं निलेश राणे यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधल्या काही ताकदवान नेत्यांच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे. शिवाय कोण खरं आणि कोण खोटं हे वेळच स्पष्ट करेल, असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.

Comments

  1. louis vuitton outlet store, http://www.louisvuittonoutletstore.name/
    prada outlet, http://www.pradahandbagsoutlet.co.uk/
    hollister clothing store, http://www.hollisterclothingstore.net/
    cyber monday deals, http://www.blackfridaydeals.us.com/
    ray-ban sunglasses, http://www.ray-bansunglasses.eu.com/
    nfl jersey wholesale, http://www.nfljerseys-wholesale.us.com/
    new balance shoes, http://www.newbalanceshoes.in.net/
    iphone cases, http://www.iphonecase.name/
    north face outlet store, http://www.thenorthfaceoutletstores.org/
    cardinals jersey, http://www.arizonacardinalsjersey.us/
    manchester united jersey, http://www.manchesterunitedonline.com/
    new york jets jerseys, http://www.newyorkjetsjersey.us/
    coach handbags outlet, http://www.coachhandbagsoutletonline.us.com/
    denver broncos jerseys, http://www.denverbroncos.org/
    beats by dre, http://www.beats-headphones.in.net/
    new england patriots jerseys, http://www.newenglandpatriotsjerseys.us/
    cheap ugg boots, http://www.uggaustralia.in.net/
    nike foamposite, http://www.foampositeshoe.net/
    swarovski crystal, http://www.swarovskicrystals.co.uk/
    michael kors handbags outlet, http://www.michaelkorshandbagsoutletstore.us.com/
    timberland shoes, http://www.timberlandboots.name/
    109

    ReplyDelete

Post a Comment