Plz Read

gopaltakwale.blogspot.in

एका गावात दोन शेतकरी होते,
दोगेही मेहनती.
खूप काम करत पण मोबदला खूप कमी मिळत असत.
.
.
त्यांचं वय झालं, दोघे देवाघरी गेले....
.
.
दोघे देवासमोर गेले, देवाने विचारलं, '
पुढच्या जन्मसाठी तुम्हाला काय हवं..??'
.
.
पहिला शेतकरी बोलला, '' देवा,
मी या आयुष्यात
खूप काम केलं... खूप मेहनत घेतली... घाम गाळला..
पण मला त्याचा योग्य मोबदला नाही मिळाला..
जेवढा पैसा कमवला तो खूप कमी होता, कर्ज
देण्यात सर्व पैसा संपला !
मला असा आशीर्वाद दे
की या जन्मी मला फक्त
पैसा मिळत राहो...
कुणाला काही द्यावं लागू नये...''
देव बोलला 'तथास्तु.....'
.
.
दुसर्या शेतकर्याला देखील तोच प्रश्न देवाने
विचारला.
दूसरा शेतकरी बोलला, '' देवा तू
मला या जन्मी जे
काही दिलं त्यात
मी समाधानी होतो... दोन वेळचं
पोट भरत होतं आमच्या कुटुंबाचं....
पण मला एका गोष्टीचं दुख: आहे
की माझ्या दारावर
आलेल्या भिकार्यांना मी पोटभर जेवण देऊन पाठवू
शकत नव्हतो....!
या जन्मी असा आशीर्वाद दे
की माझ्या दारावर
आलेल्या प्रत्येक भिकार्याचं पोट
मी भरू शकेल...''
देव बोलला ' तथास्तु....'!!
.
आता ते दोघेही त्याच गावी जन्मले.....
मोठे
झाले....!!
पण,
पहिला व्यक्ति ज्याने देवाला मागितलं
की मला फक्त
मिळत रहावे-मिळत रहावे कुणाला काही द्यावे लागू
नये....' तो बनला भिकारी, ज्याला फक्त भिक मिळू
लागली.. तो इतरांना काहीच देऊ शकत
नव्हता....'
आणि,
दूसरा व्यक्ति बनला त्या गावचा सर्वात श्रीमंत
व्यक्ति 'ज्याच्या घरच्या दरवाज्यासमोर
आलेल्या प्रत्येक भिकार्याचं पोट भरून तो पाठवत
असे....'
.
" या गोष्टीचा तात्पर्य एवढाच की ,
तुम्हाला सुखी राहायचं असेल तर आगोदर
दुसर्यांना सुखी ठेवायला पहा....
तुम्हाला सुख आपोआप मिळेल.. ''
. gopaltakwale.blogspot.in

मित्रानो आवडल तर नक्की Share पण करा....

Comments

Popular posts from this blog

बैल पोळा

🌸 कृष्ण जन्माष्टमी 🌸