बैल पोळा
*बैलांचा पोळा हा सण प्रामुख्याने विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इत्यादी भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना आराम देतात, त्यांच्याकडून शेतातील कोणतीही काम करुन घेतली जात नाही. सकाळी उठून त्यांना नदीवर नेऊन, साबणाने स्वच्छ अंघोळ घातली जाते. मग त्याच्या पाठीवर रंगाचे हाताचे ठसे, शिंगांना फुगे, बाशिंगे, बेगडी कागदी पट्ट्या, रिबीनी बांधल्या जातात. गळ्यात घुंगरु, घंटा, मणी-माळा, कवड्या, गोफ, अंगावर रंगीबेरंगी कापडांचे आरसे लावलेली झूल, गोंडे, रंगीत कासरे अशी सजावट होते.*
*यानंतर धूप, दीप लावून पूजा करतात. यावेळी पायावर दूध, पाणी घालून, आरती ओवाळून त्यांना पुरणपोळ्यांचा प्रसाद दिला जातो. शिवाय बाजरी-घुगऱ्या, कडबा, चारा, हिरवे गवत, सरकी, भिजवलेले आंबोळ, अनेक धान्यांची केलेली खिचडी, कोंड्याचे मुटके इ. देतात. मग पळण्याची स्पर्धा, बैलांची मिरवणूक, असा रितीने बैलपोळा साजरा केला जातो*
. *काही ठिकाणी पळवत नेत असताना धष्ट-पुष्ट बैलांकडून उंच उडी मारून तोरण तोडण्याची रीत आहे. ती पाहण्यासारखी असते. तोरण तोडणाऱ्या बैलाला बक्षीस मिळते.वाजत-गाजत मिरवणूक निघते. बैलपाळा का साजरा केला जातो? प्रचलित कथांनुसार, द्वापर युगात कंसाने भगवान श्रीकृष्णाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु तो या कार्यात यशस्वी होऊ शकला नाही. तेव्हा कंसाने पोलासुर नावाच्या राक्षसाला श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले पोलासुराने बैलाचे रूप धारण केले आणि ते प्राण्यांमध्ये सामील झाले. श्रीकृष्णाने त्याला प्राण्यांच्या कळपातही ओळखले आणि त्याचा वध केला. तेव्हापासून
बैल पोळा हा सण साजरा केला जातो*
जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
या पोळ्याच्या निमित्ताने आपल्या शेतकरी जीवनात समृद्धी येवो,
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई
बैल पोळ्याचा हा सण,
सर्जा राजाचा हा दिन..
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण..
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने होईल कसा उतराई
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..
बैलांच्या कष्टाला सन्मान देणाऱ्या या सणाने आपले जीवन सार्थकी लागो,
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
पोळा सणाच्या आनंदात आपल्या कुटुंबाला सुख लाभो,
पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
या पवित्र सणाने आपल्या शेतीला आणि घराला समृद्धी लाभो,
पोळा सणाच्या शुभेच्छा!
सण माझ्या सर्जा राजाचा,
ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा..
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..
शिंगे घासली, बाशिंगे लावली,
मंडुळी बांधली, मोरकी आवळली..
तोडे चढविले, कासरा ओढला,
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा..
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…
नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे..
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे..
बैलपोळ्याच्या शुभेच्छा..
👌👌👌
ReplyDelete