*बैलांचा पोळा हा सण प्रामुख्याने विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इत्यादी भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना आराम देतात, त्यांच्याकडून शेतातील कोणतीही काम करुन घेतली जात नाही. सकाळी उठून त्यांना नदीवर नेऊन, साबणाने स्वच्छ अंघोळ घातली जाते. मग त्याच्या पाठीवर रंगाचे हाताचे ठसे, शिंगांना फुगे, बाशिंगे, बेगडी कागदी पट्ट्या, रिबीनी बांधल्या जातात. गळ्यात घुंगरु, घंटा, मणी-माळा, कवड्या, गोफ, अंगावर रंगीबेरंगी कापडांचे आरसे लावलेली झूल, गोंडे, रंगीत कासरे अशी सजावट होते.* *यानंतर धूप, दीप लावून पूजा करतात. यावेळी पायावर दूध, पाणी घालून, आरती ओवाळून त्यांना पुरणपोळ्यांचा प्रसाद दिला जातो. शिवाय बाजरी-घुगऱ्या, कडबा, चारा, हिरवे गवत, सरकी, भिजवलेले आंबोळ, अनेक धान्यांची केलेली खिचडी, कोंड्याचे मुटके इ. देतात. मग पळण्याची स्पर्धा, बैलांची मिरवणूक, असा रितीने बैलपोळा साजरा केला जातो* . *काही ठिकाणी पळवत नेत असताना धष्ट-पुष्ट बैलांकडून उंच उडी मारून तोरण तोडण्याची रीत आहे. ती पाहण्यासारखी असते. तोरण तोडणाऱ्या बैलाला बक्षीस मिळते.वाजत-गाजत मिरवणूक निघते. ...
🌸 कृष्ण जन्माष्टमी 🌸 कृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा पावन उत्सव आहे. हा सण श्रावण व भाद्रपद महिन्यात (तिथीनुसार) साजरा केला जातो. श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला , रोहिणी नक्षत्रात झाला, म्हणून या सणाला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असे म्हणतात. 🔱 धार्मिक महत्त्व श्रीकृष्णावतार भगवान विष्णूंनी अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी कृष्णावतार घेतला. त्यांचा जन्म मथुरेत कारागृहात झाला. व्रत व उपासना भक्त उपवास करतात, दिवसभर नामस्मरण करतात. रात्री बारा वाजता श्रीकृष्णजन्माचा सोहळा करतात. बालकृष्णाला पाळण्यात ठेवून "नंदघरी आनंद झाला" अशा गाण्यांनी वातावरण आनंदमय होते. पूजा भगवान कृष्णाला फुले, तुलसीदल, लोणी, दही, दूध अर्पण केले जाते. गोकुळात गोकुळाष्टमीला दहीहंडी फोडून उत्सव साजरा होतो. 🌿 सांस्कृतिक महत्त्व महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यामध्ये श्रीकृष्णाने बालपणी गोपाळांसह लोणी-दहीच्या हंड्या फोडल्या, त्याचे प्रतीक मानले जाते. यामुळे एकता, साहस व संघभावना वाढीस लागते....
Comments
Post a Comment